MMRDA च्या कोपरी हायवे रस्त्या बांधकामा सोबत नाैपाडा चिखलवाडी ते आनंदनगर या “underground nallah “नाल्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी नालेदुरुस्ती इंजिनिअर कोल्हे यांचेसह पाहणी दौरा
—————————-
गेले कित्येक वर्षे भास्कर कॉलनी चिखलवाडी येथे पावसाळ्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण हाेते. नौपाड्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा कोपरी हायवे खालील नाल्याद्वारे आनंदनगर शेजारील मुख्य नाल्यात होतो .पण गेल्या कित्येक वर्षात हायवे पुलाखालील हा नाला साफ करणे कठीण होऊन बसले आहे.तरिही सद्यस्थितीत
MMRDA च्या कोपरी हायवे रस्त्याचे काम सुरू असून हा हायवे खोलवर खणण्यात आल्याने त्याखाली काही अंतरावर असलेला हा नालाही रुंद करून घ्यावा या मागणीसाठी ठा. म.पा नाले दुरुस्ती इंजिनिअर कोल्हे सह सदर ठिकाणी पहाणी दौरा करण्यात आला. ठा.म.पा.ने यासाठी MMRDA कडे मागणीही केली आहे .असे झाल्यास येथील समस्या कायमस्वरूपी दूर होईल. या पाहणी दौऱ्यात भाजपा शहर उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी तसेच स्थनिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Categories: Thane matters













