भाजपा, ठाणे महानगर पालिका व आईबाबा सामाजिक संस्थे तर्फे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर
भाजपा, ठाणे महानगर पालिका व आईबाबा सामाजिक संस्थे तर्फे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर दिनांक ०१ मार्च ते ०७ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ७० वर्षे पूर्ण असणाऱ्या व सर्व सामान्य नागरिकांसाठी नोंदणी व मोफत स्मार्ट कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले असून यात ५ लक्ष रुपयांचा मेडिकल विमा मिळतो. कार्डियाक बायपास, नी रिप्लेसमेंट, केमो थेरपी, हिप रिप्लेसमेंट, कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन, रेनल ट्रान्सप्लान्टेशन, पेस मेकर इन्प्लांटेशन, नुरो सर्जरी व बर्न्स हे उपचार नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. वैद्यकीय तपासणी, सल्लामसलत आणि उपचार, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च, औषध आणि वैद्यकीय पुरवठा, विविध रक्त चाचण्या, प्रयोगशाळा चाचण्या, सिटी स्कॅन, एम आर आय स्कॅन, वैद्यकीय रोपण, राहण्याची सोय, अन्न सेवा, रुग्णालयात दाखल केल्यानंतर फॉलोअप व काळजी घेणे हे सर्व उपचार मोफत केले जातात.
ठाण्यातील आयुष्मान भारत रुग्णालये
१) सिद्धिविनायक हॉस्पिटल
२) होरायझन प्राइम हॉस्पिटल
३) ज्युपिटर हॉस्पिटल (केवळ रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि पेडियाट्रिक कार्डिओलॉजी)
४) बेथनी हॉस्पिटल (रेडिएशन ऑन्कोलॉजी)
५) कैझेन
६) हायवे रुग्णालय
७) महावीर जैन हॉस्पिटल




Categories: Uncategorized











