विष्णुनगर येथिल छेडा & छेडा रेंटल हाऊसिंग रहिवाशांनी त्यांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी धडक माेर्चा नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांच्या कार्यालयात आणला. गेल्याच आठवड्यात नगरसेविका साै.मढवी यांनी ठामपा अधिकार्यांना घेऊन व्यक्तीश: भेट घेऊन पाहणी केली हाेती. सदर ठिकाणी विविध समस्यांची यादी जसे नादुरूस्त लीफ्ट, नादुरूस्त अग्निशमन यंत्रणा, ड्रेनेज समस्या,लीकेजचा प्रश्न, अनियमीत पाणीपुरवठा, भरमसाठ पाणी बिले, दिवा बत्तीची कमतरता, मुजाेर सुरक्षा रक्षक रहिवाशांनी मांडली. या सर्वांची गांभिर्यांनी दखल घेऊन त्या त्या संबंधीत ठामपा विभागांकडून सदरचे समस्या निवारण करून घेण्याचे आश्वासन नगरसेविका साै.प्रतिभा मढवी तसेच भाजपा शहर उपाध्यक्ष डाँ. राजेश मढवी यांचेतर्फे रहिवाशांना देण्यात आले….
Categories: Thane matters














