भाजपा व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान तर्फे जेष्ठ नागरिक ,विधवा ,अपंग यांच्यासाठी विविध जन योजना, आरोग्य योजना तसेच नवीन मतदार नोंदणी शिबिरास भरघाेस प्रतिसाद …….
—————————————————————————
दि. १ मार्च २०२० रोजी भाजपा ठाणे शहर व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने ठाण्यातील जेष्ठ नागरिक ,विधवा ,अपंग यांच्यासाठी भव्य योजना शिबीर आयोजित करण्यात आले होते . सदर शिबिरात जेष्ठ नागरिक योजना, ६५ वर्षावरी सीटीझनसाठी श्रावण बाळ योजना ,विधवा व अपंगासाठी संजय गांधी निराधार योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना , प्रधानमंत्री श्रमदान योगी योजनांचा लाभ लाभार्थीना मिळाला . तसेच मुख्य म्हणजे नवीन मतदार नोंदणी मतदार नोंदणी या शिबिराचे मुख्य आकर्षण होते . सदर शिबीर : *धैर्य सोसायटी भारकर कॉलनी ,सरस्वती मराठी शाळेजवळ नौपाडा येथे आयोजित करण्यात आले हाेते. त्यास भरघाेस प्रतिसाद मिळून अंदाजे 750 लाभार्थीनी याचा लाभ घेतला. आयोजक नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी व भाजपा शहर उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी यांचे लाभार्थींनी आभार मानले.
Categories: Thane matters











