माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी करोना पासून लढण्यासाठी सर्व नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.त्याची दखल घेत नाशिक वरून थेट ताजा भाजीपाला वाजवी दरात प्रत्येक सोसायटी पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भाजपा ठाणे व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. आमदार श्री.संजयजी केळकर तसेच अध्यक्ष ,आमदार श्री.निरंजनजी डावखरे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमासाठी नौपाडा पोलीस स्टेशनच्या सिनिअर पी.आय अनिल मांगले सरांचा मोलाचा हातभार आहे.
मुख्य म्हणजे अत्यंत शिस्तबद्धपणे सोशल डिस्टनसिंग व मास्क या दोन्ही गोष्टीची खबरदारी घेण्यात येत आहे.
आज परिसरातील सन्मित्र सोसायटी, अनिल सोसायटी, परमसुख सोसायटी, राजदीप सोसायटी व इतर अशा मोठ्या सोसायटी ना वाटप करण्यात आले. या उपक्रमा बद्दल परिसरातील जेष्ठ नागरिक व महिला वर्गाने खूप धन्यवाद दिले.या उपक्रमात ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच डॉ .राजेश मढवी ,सचिन सकपाळ,मंदार जोशी,राजेंद्र शहा यांचे सहकार्य लाभले.
Categories: Thane matters
















