ठा .म.पा.च्या नाैपाडा आराेग्य केन्द्रास स्थानिक नगरसेविका साै.प्रतिभा मढवी व भाजपा उपाध्यक्ष डाँ. राजेश मढवी यांनी भेट दिली. सदर ठिकाणी ड्यूटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डाँ. शलाका थाेरात यांचे काैतुक केले. या परिसरातील काेणत्या प्रकारचे रूग्ण येतात, काेणत्या प्रकारचे उपचार केले जातात तसेच दवाखान्यात औषधे पुरेशी आहेत का? स्टाफ आहे का? मास्क, सँनीटायझर, साेशल डिस्टेन्सिंग याेग्य प्रकारे राबविले जाते का? काेराेनासद्रूष पेशंट आल्यास काय केले जाते याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. आणि तशीच काही गरज लागल्यास आमची मदत घ्यावी असाही विश्वास देण्यात आला.

Categories: Thane matters











