Thane matters

माजीवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती सौ.पदमा यशवंत भगत व उपविभाग प्रमुख श्री.यशवंत भगत यांनी अन्नधान्याचे वाटप केले .

कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन च्या काळात भारत सरकार व महाराष्ट्र राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व व्यवहार बंद ठेवणे, तसेच नागरिकांना गरज नसल्यास घरीच राहण्याबाबत आवाहन केले आहे.
म्हणून नगरविकास मंत्री व ठाणे पालक मंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व ठाणे महापौर मा.श्री. नरेशजी मह्स्के साहेब यांच्या आदेशानुसार ,
माजीवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती/स्थानिक नगरसेविका सौ पदमा यशवंत भगत यांच्या वतीने प्रभाग क्र ३ मधील हातावर पोट असलेली मंडळी,निराधार व स्थानिक गरजु नागरिकांना अन्नधान्याचे वाटप दिनांक २७/०३/२०२० शुक्रवार रोजी करण्यात आले.
यावेळी उपस्थित उपविभागप्रमुख श्री. यशवंत भगत, शाखाप्रमुख श्री.देवानंद भगत, श्री शशिकांत आंब्रे,विक्रांत वायचळ,व मनोरमा नगर शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी व सर्व महिला आघाडी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: Thane matters

Tagged as: , ,

Leave a comment