Thane matters

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला परिवार समजून कर्तव्य निभावत आहेत

अत्यंत विचारी, खंबीर, कणखर नेतृत्व लाभणे हे महाराष्ट्राचं भाग्यच!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच का?सन्मानीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर लगेचच काही लोकांची पोटदुखी सुरू  झाली.बाळासाहेब असते तर असे झाले नसते,साहेबांनी कधीच कोणतीही निवडणूक लढवली नाही,कोणतंही शासकीय पद घेतले नाही,वगैरे वगैरे….काय घडतंय हे कोणालाच कळत नव्हते. सन्मानीय खासदार श्री संजयजी राउत साहेब शिवसेनेचाच मुखमंत्री व्हावा म्हणून सर्व ताकत पणाला लावून लढत होते. आज जगभर पसरलेल्या महाभयंकर रोगामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

बाळासाहेबांच्या मुंबईवर ,मराठी माणसावर, संपूर्ण महाराष्ट्रावर खुप मोठे संकट येणार ,जणूकाही याची भीतीच नियतीला असावी आणि येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे नेतृत्व खंबीर हवे म्हणूनच काय सन्मानीय संजय राऊत साहेबांकडून निर्भयपणे नियतीने ही लढाई यशस्वी करवून घेतली अaसावी. कारण यावर मात करण्याचे काम खंबीर ,कणखर आणि प्रेमळ कुटूंबप्रमुख करू शकतो. आज निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीवर आपले मुख्यमंत्री मात करत आहेत,खुप मोठे निर्णय घेतले जात आहे.

परिस्थिती आटोक्यात आणताना माझ्या कुटूंबातील म्हणजेच माझ्या महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तिला,समाजातील कोणत्याही घटकाला त्रास होणार नाही, याची खबरदारी कुटूंबप्रमुख ह्या नात्याने उद्धवजी घेत आहेत.हे सत्तानाट्य त्यावेळेस घडले नसते तर आपल्याला असा कणखर कुटूंबप्रमुख लाभला नसता.राऊत साहेबांचे प्रत्येक पाऊल किती योग्य होते हे आज वेळ सांगत आहे.सन्मानीय मुखमंत्री श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्या कठीण  परिस्थितीत जेव्हा जनतेला संबोधतात तेव्हा असा भास होतो जणू आपला कुटूंब प्रमुख आपली काळजी घेतोय.

कोणताही निर्णय घेताना पूर्णपणे जबादारी दिसते.सत्तेचा माज नाही,गर्व नाही, समोर बघताना असे वाटते, काळजीपोटी पोटतिडिकीने साहेब संबोधित करत आहे.अश्या कठीण काळात उद्धव साहेबांसारखं अत्यंत विचारी, खंबीर, कणखर नेतृत्व लाभणे हे महाराष्ट्राचं भाग्यच! ह्या सत्तानाट्य-रथाचे सारथी सन्मानीय खासदार श्री संजयजी राऊत साहेब ह्यांचेही मनापासून धन्यवाद। नियतीचेही आभार मानावेसे वाटते जिने हे सगळे जुळवून आणले.

 जय महाराष्ट्र

विनय मोतीराम दळवी

Leave a comment