कळवा पूर्व विभागातील विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे विनामूल्य वाटप काल दि.८/४/२० रोजी विभागातील गरीब आणि गरजू २००(दोनशे) विधवांना शिवसेना नगरसेवक मा.श्री.राजेंद्र साप्ते यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.लॉकडाउन व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक महिलेस ५ किलो तांदूळ,५ किलो गहू,१ किलो तूरडाळ,१ लिटर रिफाईंड तेल,हळद,मसाला,मिठ या दैनंदिन गरजेच्या वस्तू देण्यात आल्या. आतकोनेशवर नगर नं.१ आणि २,पौंड पाडा, शिवशक्ती नगर येथील महिलांना पहिल्या टप्प्यात सदर वस्तू वाटप करण्यात आले. एक कर्तव्य असल्याने या वस्तू वाटप कार्यक्रमाचा एकही फोटो काढण्यात आला नाही.हा शिस्तबद्ध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख शैलेश समर्थ, आत्मा सिंग,उपविभाग प्रमुख सुभाष शिर्के, सुभाष थळे आणि सचिन घोले,ओमप्रकाश शर्मा, सुनिल हळदणकर यांनी परिश्रम घेतले.
Categories: कळवा Matters











