सध्या आपल्या देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,वसई तालुक्यातील रहिवासी यांना जीवदानी ट्रस्ट, साई धाम मंदिर ट्रस्ट, विवा चॅरिटेबल ट्रस्ट व इतर सहयोगी संस्था यांच्या सहकार्याने विनामूल्यअन्न वाटप चालू असून रोज सुमारे एक लाख लोकांना याचा लाभ होत आहे.
सदर अन्न वाटप उपक्रमास वसई तालुक्यातील रहिवासी संस्था, सामाजिक मंडळे, संस्था, रहिवासी, व्यापारी मंडळे, यांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन लोकनेते आमदार श्री. हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
यानुसार मनवेलपाडा विरार पूर्व विवा जागींड कॉम्प्लेक्समधील रश्मी गार्डन A ते I विंग बिल्डिंग यांच्या वतीने रु.21000/- चा धनादेश आज शनिवार रोजी जीवदानी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष नगरसेवक श्री.पंकज ठाकूर, विश्वस्त श्री.काशिनाथ पाटील यांना देताना स्थायी समिती सभापती श्री.प्रशांत राऊत,रश्मी गार्डन अध्यक्ष श्री.हरिष सिंग, उपाध्यक्ष श्री.हर्षद राणे
Categories: vasai virar











