ठाणे Matters

1000 गरजुना दररोज एकवेळचे जेवण

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. श्री ठाणे वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ आणि के के क्विकफूड यांच्यातर्फे हिंदू जागृती मंडळ,नौपाडा ठाणे ह्यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील विविध श्रमिक वस्त्यांमधील 1000 गरजुना दररोज एकवेळचे जेवण देण्यात येत आहे. हि जेवणाची पॅकेट्स
के के क्विक फूड,विष्णूनगर नौपाडा येथे तयार होतात आणि हिंदू जागृती मंडळाचे कार्यकर्ते त्याचे वितरण करतात. अश्या कठीण प्रसंगात विविध संस्थांचा मेळ साधून योग्य व्यक्तींकडे योग्य मदत कशी पुरवता येते ह्याचे उदाहरण म्हणून ह्या उपक्रमाला महत्व आहे. या संस्थांच्या गुंफणीतून एक मोठं काम ठाणे शहरातील गरजूंसाठी उभं राहील आहे.

Leave a comment