worli matters,

दिविज फाऊंडेशन तर्फे गरजू कुटुंबांना धान्य (रेशन सामग्री) वाटप

वरळी विधानसभा मतदार संघात, पालिकेचा जी-दक्षिण विभाग संपूर्ण मुंबईत सर्वाधिक कोरोना संक्रमित विभाग आहे. बहुतेक झोपडपट्ट्या या विभागात आहेत. या लॉक डाऊन दरम्यान या भागात दिविज फाऊंडेशन चे संचालक अमृता देवेंद्र फडणवीस या भागातील हजारो गरजू कुटुंबांना धान्य (रेशन सामग्री) वाटप करत आहे . संतोष पांडे – भाजप महाराष्ट्र सचिव – प्रोटोकॉलचे नेतृत्व आता पर्यंत – मेरीअम्मा नगर ,मद्रास वाडी,मोतीलाल नेहरू नगर,महात्मा फुले नगर,वरळी डेअरी स्टाफ क्वार्टर,किंग जॉर्ज हॉस्पिटल स्टाफ क्वार्टर,वरली रेस कोर्स कामगार वसाहत,महालक्ष्मी सात रसता धोबीघाट,वरली बी डी डी चाल नं ११६-११८ स्थित डा.बाबा साहेब आंबेडकर शासकीय मुलांचे व मुलींचे हॉस्टल या सर्व ठिकाणी गरजू लोकांना मदत केली गेली.

या कार्यात, भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण मुंबईचे उपाध्यक्ष – अंकुश येडगे, शैलेंद्र सिंह, अयाज बेग, लाल बहादुर गुप्ता, अनिल जयस्वाल, सनी गुप्ता, दर्शन पुगावकर, अनिल पांडे, इरशाद शेख ,वरदा राजन, अमन देवेंद्र आणि असंख्य कामगार या कामात गुंतले आहेत. अनुसूचित जन जाती मोर्चा मुंबईचे अध्यक्ष मयूर देवडेकर आणि माजी नगरसेवक चंद्रकांत पुगावकर हेही या कामात गुंतले आहेत.

Categories: worli matters,

Tagged as: ,

Leave a comment