Thane matters

कंत्राटी व घंटागाडी कर्मचारी यांना मदतीचा हात

प्रभागातील महापालिका सफाई, कंत्राटी व घंटागाडी कर्मचारी यांना ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान व नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे मदतीचा हात

कोरोनाच्या पाश्वभूमीवर डॉक्टर ,पोलिस यांच्या जोडीलाच महापालिकेचे सफाई कामगार, कंत्राटी कामगार,घंटागाडी कामगार हेही जीवावर उदार होऊन काम करीत आहेत.सफाई करीत असलेला भाग कटेन्मेंट झोन असो  किंवा नसो त्यांचे अविरत काम चालू  आहे . परंतु लॉकडाऊनमध्ये त्यांच्या कुटुंबियांची फार ओढाताण होत आहे.ही बाब लक्षात घेऊन ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान व नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी  यांचे वतीने या गरीब गरजू कर्मचाऱ्यांना धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप पंपिंग स्टेशन येथील पेटीवर करण्यात आले.यावेळी महापालिका सफाई प्रमुख अहीरे,संतोष शेतकर व संस्थेचे कार्यस्वक व  डॉ .राजेश मढवी भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष उपस्थित होते  .

Leave a comment