Thane matters

बाहेरगावी प्रवास करू इच्छित असणार्या प्रभागातील नागरिकांचे मोफत मेडीकल एक्झामीनेशन व ” मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट “

नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे त्यांच्या घंटाळी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली

ठाणे जिल्ह्यातून बाहेर राज्या मध्ये जाणार्या कामगार/ पर्यटक/ भाविक/ विद्यार्थी व इतर व्यक्तींची शासनाने नमूद केल्याप्रमाणे भरून देण्याचे फाँर्म हे नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी आणि डॉ.राजेश मढवी- ठाणे शहर उपाध्यक्ष भाजपा यांच्या घंटाळी, साईबाबा मंदीराशेजारील येथिल कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या घंटाळी येथिल कार्यालयात डॉ.सुभाष पाटील यांचे तर्फे वैद्यकीय तपासणी तसेच  मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले.ही व्यवस्था नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे पूर्णपणे मोफत करण्यात आली होती .आज प्रभागातील १५४ नागरिकांनी याचा लाभ घेतला.

Leave a comment