कोरोना वैशिक साथीच्या आजारात मनसे कार्यकर्ते केनिवाडी, म्हाडा कॉलनी, दत्त मंदिर, शास्त्री नगर, आंबेवाडी, जैन इस्टेट, पांडे चाळ यासह सर्व झोपडपट्ट्यांमध्ये व इमारतींमध्ये औषदाची फवारणी करत आहेत. मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने हे प्रयत्न १ महिन्यापासून सतत सुरू ठेवले आहे . भांडुपच्या सभोवतालच्या आवारात राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग ११० चे शाखा प्रमुख मोहन चिराथ यांच्या मदतीने दररोज कामगार वर्ग गरीब असहाय लोकांना अन्न वाटप केले जात आहे . आणि हे काम लॉकडाऊन होईपर्यंत सुरू राहील. यासह सर्व झोपडपट्ट्यांमध्ये व इमारतींमध्ये सॅनिटायझर फवारण्याचे कामही सातत्याने सुरू राहणार आहे.
Categories: भांडुप matters











