प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठया संख्येने आलेल्या कामगारांच्या गर्दीचे नियंत्रण हिंदूजागृती मंडळाच्या च्या कार्यकर्त्यांनी केले
कोरोना योध्या डॉ.निर्मला शहा
ठाणे, दि. ५ मे : कोरोना आपत्तीच्या काळात येथील नौपाड्याती डॉ.निर्मला शहा यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. देशातील विविध राज्यातील कामगारांना स्वगृही पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने गाड्या उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्या कामगारांच्या प्रवास खर्चाची तरतूद सरकारने केली आहे. मात्र, अश्या आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांना तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र ( fitness Certificate ) प्रवासापूर्वी देणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी कामगारांकडून शुल्क आकारले जात असल्याची चर्चा असताना,नौपाड्यातील डॉ. निर्मला शहा यांनी अश्या सर्व कामगारांना विनामूल्य सेवा दिली आहे. डॉ. निर्मला शहा यांनी अश्या सर्व कामगारांची आवश्यक तपासणी करून त्यांना तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र ( fitness Certificate ) निःशुल्क दिले आहे. कोरोना आपत्तीत सेवा म्हणून हे काम डॉ. निर्मला शहा यांनी केले आहे. आत्तापर्यंत सुमारे पंधराशे पेक्षा अधिक कामगारांना त्यांनी प्रमाणपत्र दिले आहे. सरकारने निर्णय घेतल्यानंतर रोज सहा तास ही सेवा डॉ. निर्मला शहा यांनी दिली आहे. या कामासाठी भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी डॉ.निर्मला शहा यांना पीपीई किट दिले आहे. रोटरी क्लब ठाणे ने डॉ.निर्मला शहा यांना टेम्परेचर गन दिली आहे.
डॉ. निर्मला शहा यांनी थेट कृतीतून खाजगी डॉक्टर्सना सेवेचा संदेश दिला आहे. डॉक्टर यानात्याने संकटकाळी सामाजिक बांधीलकी प्रकट केली आहे. कर्तव्य भावनेतून काम करणाऱ्या डॉ. निर्मला शहा यांनी आवश्यक असल्यास अशी सेवा पुन्हा देण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. डॉ. निर्मला शहा यांच्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे. प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठया संख्येने आलेल्या कामगारांच्या गर्दीचे नियंत्रण हिंदूजागृती मंडळाच्या च्या कार्यकर्त्यांनी केले.
Categories: Thane matters














