कोरोना महामारी सारख्या संकटाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाउनच्या टप्प्यात जाताना हे स्पष्ट होत आहे की काही लोकांकरिता खरे आव्हान म्हणजे कोरोनाव्हायरसपासून दूर राहण्या बरोबर जिवंत राहण्यासाठी पुरेसे अन्न मिळविने हे आहे. अशा समाजातील घटकाना मदत करण्यासाठी ‘ रे ऑफ होप ‘ ही स्वयंसेवी संस्था पुढे आली.
रे ऑफ होप ही अनाथ आश्रम आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी काम करणारी संथा आहे. लॉकडाऊनच्या काळात रे ऑफ होप आणि शिशु प्रेम समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजूना मदत करण्याचे रे ऑफ होप संस्थेचे अध्यक्ष एडवर्ड परेरा यांनी ठरवले.
रे ऑफ होप आणि शिशु प्रेम समाज संस्था गरजू कुटुंबाना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचे काम लॉकडाउन सुरु झाल्या पासून निरंतर करत आहे, जेणेकरून कोणीही उपाशी पोटी राहुनये.
कोरोना महामारी सारख्या संकटात संस्थेच्या स्वयंसेवकांचा जीव धोक्यात न घालता, रे ऑफ होपचे अध्यक्ष एडवर्ड परेरा स्वतः मोफत अन्नधान्य वितरीत करण्याचे काम करतात.
ते गरजू आणि रोजंदारीवरील सर्व मजुरांसाठी स्वत: चा जीव धोक्यात घालत आहे. ते व्हायरस किंवा कशाचीही भीती न बाळगता , फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेउन, देवाने त्यांना दिलेले कार्य करीत आहेत.
Categories: NGO
















