लॉक डाउन काळात नाभिक समाजाला खूप मोटा फटका बसलेला आहे , या समाजातल्या कुटुंबांचा हाल होत आहे , दुकाने बंद ,कधी उघडतील ह्याची काहीही लक्षणे नाही. ही कुटुंबे आपली दु:खे, व्यथा कुठे मांडणार त्यांच्या व्यवसायाना कधी परवानगी मिळणार काही माहिती नाही. अशा परिस्थितीत नाभीक समाज उत्तन , मुलांनी एकमेकास करू साह्य अवघे धरू सुंपथ या उक्तीप्रमाणे तरूण मुलांनी उत्तन, गोराई, मनोरी मढ, या विभागातील सर्व नाभिक घरात अन्नधान्य ची मदत केली. उत्तन विभागातील कार्य करणाऱ्या श्रीमती अलका शिंदे, सौ सुहासिनी विभाड, तसेच भूपेश क्षीरसागर, नितीन क्षीरसागर, नागेश शिंदे, दिनेश सांळूके, लक्ष्मण काशिद , योगेश राऊत , वर्षा भामरे , लता शिंदे , आणि उत्तन, गोराई, मनोरी, मढ, गावातील नाभिक समाजातील तरूण मुले यांचा सहकार्य लाभले
Categories: uttan matters











