मीरा रोड matters

एच एफ एफ च्या पदाधीकारी सौ रंजिता कांबळे यांचे मीरा भाईंदर प्रभागात मौलाचे सहकार्य

एच एफ एफ च्या पदाधीकारी सौ रंजिता कांबळे यांनी २०० परिवारांना लॉक डाउन काळात मदत केली आहे. एच एफ एफ आणि इतर दानशूर व्यक्ती कडून निधी गोळा करून त्यांनी हे शक्य करून दाखविले , सौ रंजिता कांबळे व त्यांचे पति श्री संजय कांबळे प्रत्यक्षात लोकांना धान्य वाटप करत होते . एच एफ एफ संस्थापक नवेद शेख ,एच एफ एफ  पदाधीकारी पंदारी शेट्टी यांचे विशेष सहकार्य लाभले . कणाकिया , पेणकरपाडा ,इंद्रलोक ,भाईंदर प ,गोल्डन नेस्ट ,काशिगाव ,नताशा पार्क, नायगाव , नालासोपारा , दहिसर आणि इतर ठिकाणी त्यांनी जातीने जाऊन परिवारांना मदत पोहचविली . मीरा – भाईंदर महापौर श्रीमती ज्योत्सना हसनाले आणि उप महापौर श्री हसमुख गेहलोत यांनी सौ रंजिता कांबळे यांचे एच एफ एफ च्या माध्यमातून प्रशंसा केली .

Leave a comment