गावदेवी कब्रस्तान भागात ईद पूर्व आफ्तारी साठी नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी विविध प्रकारच्या फळांचे वाटप करण्यात आले. भाजपा आमदार संजयजी केळकर व अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे यांच्या नेतृत्तवाखाली गरीब बांधवांना ही ईद पूर्व भेट देण्यात आली. विभागातील कार्य सेवकांनी हे वाटप केले. डॉ . राजेश मढवी- भाजपा उपाध्यक्ष ठाणे यांचे विशेष सहकार्य .
Categories: ठाणे Matters











