ठाणे Matters

समाजालाच स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज – डॉ. राजेश मढवी

कोरोनाच्या पाश्वभूमिवर  नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या तर्फे  प्रभागातील सोसायट्यांना फवारणी पंप / केमिकल वाटप…..( नागरिकांसाठी सुरक्षा कवच)

कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे. रोज हजारोंनी रूग्ण संख्या वाढत आहे . सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण आहे . अशावेळी समाजालाच स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज आहे. या बाबींचा विचार करून आमदार संजयजी केळकर व ठाणे भाजपा अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नागरिकांना  सॅनिटाईझेशन फवारणी पंपाच्या व सोबत फवारणी केमिकल च्या रुपाने  सुरक्षा कवच देण्यात येत आहे. सदरचे वाटप स्थानिक नगरसेविका सौ. प्रतिभा मढवी व भाजपा उपाध्यक्ष ,ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान चे डॉ. राजेश मढवी यांचे तर्फे प्रभागातील मोठ्या सोसायट्या तसेच स्लम भाग यांना करण्यात आले.

Leave a comment