NGO

पार्लेस्वर ढोल ताशा पथक आणि पार्लेस्वर प्रतिष्ठान द्वारे समाजातील नागरिकांसाठी मदतीचा हात

कोरोना विषाणूच्या या महामारित पार्लेस्वर ढोल ताशा पथक आणि पार्लेस्वर प्रतिष्ठान द्वारे करण्यात आलेली अनेक सामाजिक उपक्रमे व त्यांची यादी.

१. विभागातील रोजच्यारोज वस्तू विकून कमावणाऱ्या सिग्नल वरील लहान मुलांना बिस्किट्स आणि एनर्जी ड्रिंक चे वाटप.

२. 24 तास ऑन ड्यूटी असलेल्या महाराष्ट्र पोलीस यांना बंदोबस्त असलेल्या ठिकाणी जाऊन एनर्जी ड्रिंक चे वाटप.

३. विभागातील गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप.

४. महाराष्ट्र पोलीस विलेपार्ले पोलिस ठाणे येथील सर्व पोलीस मान्यवरांना मास्क आणि सँनी टायझर वाटप.

५. विभागातील स्मशानभूमी, महाराष्ट्र पोलीस, सफाई कर्मचारी, हॉस्पिटल मधील कर्मचारी आणि न्यूज रिपोर्टर यांचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी पीपीई किटचे वाटप.

६. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आव्हानानंतर कोरोना विषाणूच्या काळात दोन दिवस रक्तदान शिबिर.

७. कूपर हॉस्पिटल मधील परिचारिका, सफाई कामगार, वॉर्डबॉय यांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या कुटुंबांना अन्नधान्य वाटप.

८. विभागातील नागरिकांचा व त्यांच्या जीवनाचा विचार करून आणि परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना माफक दरात ऑनलाइन घरपोच भाजी सेवा.

९. विभागातील दुकानदारांना फेस शिल्ड से वाटप.

१०. कोरोना ग्रस्त कुटुंबांना कोणत्याही पद्धतीचा मदतीचा हात.

११. कोरोना ग्रस्त रुग्णांना लागणाऱ्या वस्तूंची हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याची सेवा.

१२. विभागातील इतर रुग्णांसाठी पार्लेस्वर रुग्ण वाहिनी सेवा.

१३. कोरोना ग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिका न मिळाल्यास त्यांच्यासाठी देखील पार्लेस्वर रुग्ण वाहिनी सेवा पुरवणे.

१४. 24 तास महाराष्ट्रासाठी तत्पर असलेल्या महाराष्ट्र पोलीस आणि कोरोना ग्रस्त मुंबई पोलीस यांच्यासाठी 500 पुठ्यांचे बेडस् तयार करण्यात आले.

१५. लॉकडाऊन  शितल झाल्यानंतर रोजच्या रोज कमावणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप (सुमारे एक हजार विद्यार्थी).

१६.  पावसाळ्यात  घराचे छत  गळू नये म्हणून आदिवासी पाड्यातील प्रत्येक घरांना वापरलेले बॅनर आणि होल्डिंग्स यांचे वाटप.

१७. विभागातील प्रत्येक बिल्डिंग आणि चाळीत मोफत सँनिटायझेशन प्रक्रिया.

१८.  पार्लेस्वर पथकाच्या फेसबुक पेज द्वारे घरी असलेल्या डीजे कलाकार, सेलिब्रिटी आणि.

जादूगार कलाकार यांच्याद्वारे सर्व लहान मुलांचे आणि चाहत्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी फेसबुक लाईव्ह द्वारे या कलाकारांच्या कलेचे सादरीकरण.

पुढे देखील पार्लेस्वर ढोल ताशा पथक आणि पार्लेस्वर प्रतिष्ठान द्वारे समाजातील नागरिकांसाठी व त्यांच्या सुरक्षित जीवनासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदतीचा हात पुढे करण्यात येणार आहे.

Categories: NGO

Leave a comment