एडवर्ड परेरा यांनी २०११ मध्ये स्थापन केलेली ही स्वयंसेवी संस्था रस्त्यावर आणि अनाथ मुलांना शिक्षण प्रधान करते . जागतिक महामारीच्या काळात या स्वयंसेवी संस्थेने रोजंदारी, गरीब व गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.
“बर्याच स्वयंसेवी संस्था या संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी काम करत आहेत. रे ऑफ होप प्रेसिडेंटशी संपर्क साधला असता आम्हाला त्यांनी सांगितले की इतर स्वयंसेवी संस्था देखील गरीब आणि दैनंदिन मजुरांना मदत करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुकही केले . रे ऑफ होपने ज्यांना गरज असेल तिथे शक्य ते मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
रे ऑफ होपचे अध्यक्ष श्री. एडवर्ड परेरा यांनी हे सुनिश्चित केले की दररोज लॉकडाउन मध्ये रोजंदारी व गरजू कुटुंबांना सामाजिक दुरवस्थेच्या निकषांचे काटेकोर पालन करून मदत करत राहायचे . आत्तापर्यंत या रोजंदारी व गरजू कुटुंबांना किराणा सामानाच्या स्वरूपात दिलासा दिला जात आहे आणि लॉकडाउन बंद होईपर्यंत मदत सुरू ठेवण्याची आशा आहे.
गेल्या सहा आठवड्यांत, त्यांनी , जोगेश्वरी, वर्सोवा, मोगरपाडा, डीएन नगर, गिलबर्ट हिल यासारख्या ठिकाणी व सर्व झोपडपट्टी भागात मदतकार्य केले.
Categories: NGO



















