मज काही सीन न व्हावा यासाठी ।
कृपा तुम्हा पोटी उपजली ।।
होते तैसे केले आपुले उचित ।
शिकविले हित बहु बरे..।।
जगद्गुरु तुकोबारायांच्या पाचव्या वेदांच्या उपरोक्त पंक्ती कोरोना संक्रमितांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर-परिचारिका सोबत कळवा (पूर्व) विभागातील झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या कोरोना संक्रमीतांना तत्पर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य नगरसेवक तथा मा.उपमहापौर राजेंद्र रमेश साप्ते.
मातृ पितृ सेवेच अविरत व्रत जोपासणाऱ्या…. त्यांच्या वृद्धपकाळात माऊली प्रमाणे त्यांचे संगोपन करणाऱ्या साप्ते साहेबांच सेवांव्रत लाखोंत एक…. म्हणूनच मातृ-पितृ निवर्तनानंतर जनसेवा हिच ईश्वरसेवा….असे मानत जनसेवेसाठी सदैव तत्पर २४ तास…. दिवसा-रात्री…अपरात्री कोणीही ही फोन करावा साहेब…जय महाराष्ट्र ! जय महाराष्ट्र !! बोला…. काय काम….? साहेब आमच्या चाळीत/मंडळात कोरोना सदृश्य रूग्ण असल्याची शक्यता आहे किंवा संबंधित रुगणांचा रिपोर्ट कोरोना Positive आला आहे एवढेच सांगायचे…पुढची जबाबदारी साप्ते साहेबांची…. कोरोना टेस्ट कुठे करायची ? इथपासून मार्गदर्शन ते पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्वसामान्य रुग्णावर शासकीय रुग्णालयात जोपर्यंत उपचार सुरू होत नाहीत तोपर्यंत हा अवलिया स्वस्थ बसत नाही…. घेतला वसा टाकत नाही. हीच त्यांची खासियत आणी अंगिकारलेले सेवाव्रत….
कोरोना संक्रमित रुग्नांवर उपचार सुरू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना,नातेवाईकांना,स्वकीयांना धीर देणे….. कोरोना संक्रमित व्यक्ती पूर्णपणे बरी होते हे वेळोवेळी पटवून देणे…. त्यांचे मनोबल उंचावणे…. अगदी त्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे…..
कर्म-धर्म संयोगाने किंबहुना दुर्दैवाने धर्मवीर मित्र मंडळात काल सकाळी ९:०० वा.च्या सुमारास व रात्री ८:०० वा.च्या सुमारास दोन व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट Positive आल्याचे त्यांना फोनच्या माध्यमातून समजताच तात्काळ सूत्रे हाती घेऊन एक-दिड तासाचे आत ऍम्ब्युलन्स हजर…. तात्काळ शाशकीय रुग्णालयात उपचार सुरु…. दिवसागणिक अशा किती कोरोना संक्रमित रुग्णांना तात्काळ सेवा ते उपलब्ध करुन देतात याची गणती नाही.
Categories: कळवा Matters











