मा मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेना शाखांमध्ये दवाखाना सुरु करण्यात आला आहे . शिवसेना शाखा ६६ व ६७ मधील दवाखान्याचे परिवहनमंत्री , विभागप्रमुख ऍड अनिल परब यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले . शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम टीम पुढाकार घेत अनेक सेवा देत आहेत. विधानसभा संघटक संजय मानाजी कदम , विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन व टीम अहोरात्र सेवाकार्य करत मोठ्या प्रमाणात कार्य करत असून संपूर्ण अंधेरी पश्चिम क्षेत्रात एकात्मतेने जोमात सेवा पुरवत आहेत. सेवाकार्याचा लवाजमा बघत अनेक समाजसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या असून शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मार्फत आपल्या सेवा पुरवित आहेत.
अनेक सामाजिक , खाजगी संस्था व स्वतंत्र व्यक्ती सहकार्य करत आहेत . लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसापासून नियमितपणे ४२०० बेघर व गरजू लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपर्यंत २००००० लोकांनी लाभ घेतला आहे. २१००० गरीब परिवाराना जीवनावश्यक खाद्यपदार्थ (तांदूळ, गहू, आटा, तुरडाळ, गोडतेल, साखर, चहापावडर, कांदे, बटाटे इ.) चे वाटप करण्यात आले आहे. वन रुपी क्लिनिक च्या माध्यमातून १००००० लोकांची थर्मल फिवर स्क्रिनिंग करण्यात आले व विभागातील सर्व लोकांची ऑक्सिमिटर तपासणी करण्यात आली. विभागातील पोलीस कर्मचारी, महापालिका, प्रशासकिय, बेस्ट कर्मचारी व लोकांना ३००००(तीस हजार) मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. युवासेना अंधेरी मार्फत गरोदर महिला व वयस्कर व्यक्तींना
रुग्णालयाकरिता मोफत रुग्णवाहीकेची सेवा व नागरिकांकरिता स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करण्यात आला आहे. २०० खाजगी डॉक्टर व कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पी पी ई किट मोफत देण्यात आले. भूतदया जपत रस्त्यांवरील भटके कुत्रे व मोकाट जनावरांना खाद्य देण्यात येत आहे. पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले.
“सर्वसामान्य लोकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे, यावेळी आम्ही मदतीचा हात पुढे करून जीवनावश्यक वस्तू व आरोग्य विषयक सेवा देत आहोत. नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत.”
– सुनिल खाबिया जैन
विधानसभा समन्वयक
Categories: अंधेरी matters
















