अस्मिता गोखले
डॉ बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथून BSC उद्यानविद्या ची डिग्री १९९३ मध्ये घेतली. जपान च्या ओहारा स्कूल तर्फे पुष्परचनेची मान्यताप्राप्त टीचर म्हणून वर्कशॉप घेते. गेले 26 वर्ष गार्डन विकास ह्या व्यवसायात सक्रिय. वेगवेगळ्या कंपन्या, बिल्डर्स, फार्म हाऊस, ५ स्टार हॉटेल्स ची गार्डन तयार केली आहेत. मुंबई , पुणे, एम्बी व्हॅली, लोणावळा, बंगलोर, गोवा इत्यादी ठिकाणी काम केले आहे. गोरेगाव येथील आरे भास्कर गार्डन व ब्रीच कँडी येथील हरीश महिंद्रा चिल्ड्रेन्स पार्क गार्डनला उत्कृष्ठ गार्डन चे पारितोषिक मिळाले आहे. प्रसन्ना ट्रस्ट, बंगलोर द्वारा जवळपास ३५००० मुलांसाठी निरोगी माईंड व व्हिजन २०२० ह्या विषयावर मार्गदर्शन केले . गेले साडेतीन वर्ष सातत्याने मुलुंड मध्ये अंत्योदय प्रतिष्ठान आयोजित दर गुरुवारी आठवडी बाजार संकल्पनेतून शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आजही चालू आहे.
अथक फौंडेशन ची- फाउंडर चेअरमन/ ट्रस्टी अस्मिता गोखले – प्लास्टिक मुक्त मुलुंड आणि मुंबई साठी गेले साडेतीन वर्ष काम करीत आहे. आत्तापर्यंत ३८ ड्राइव्हस् मध्ये मिळून साधारण ६० रिसायकल / रियूझ टन प्लास्टिक रिसायकल / रियूझ / किंवा लॅन्डफिल ला जाण्यापासून रोखले. ह्या प्लास्टिक इलेक्ट्रिसिटी निर्मिती व हाई स्पीड डिझेल तयार करण्यासाठी पुण्यात पाठवले.
कोरोनाच्या काळात- आमदार आणि खासदार यांच्या मदतीने अस्मिता गोखले यांनी आर्सेनिक अल्बम ३० चे सर्व सफाई कामगार व पोलीस याना औषध वाटप केले. मुलुंड मधील अनेक सोसायट्याना डायरेक्ट शेतकऱ्यांकडून भाजी पाला व फळे पुरवली. साधारण ४० टन भाजीपाला पुरवण्यात आला , अजूनही हे काम चालू आहे. कोरोना बाधित पेशंट ना त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून, फळे, लिंबू इत्यादिचे वाटप केले.
जागतिक परिचारिका दिनाच्या दिवशी मुलुंड मधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परिचारक व परिचारिका याना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर कमी उत्पन्न गटातील घरांना आमदारांतर्फे मोफत शिधा वाटपकेले. खासदार व आमदाराच्या सहकार्याने वस्तीवस्तीत मेडिकल कॅम्प चे आयोजन केले, जवळपास २००० लोकांचे करोना संदर्भात चेकप करण्यात केले .
पुरस्कार-
भारतीय स्त्री जीवन विकास परिषद, पुरस्कृत बकुळाबाई देवकुळे सामाजिक कार्य पुरस्कार- जण २०१९
समर्थ भारत व्यासपीठ तर्फे सामाजिक कार्याबद्दल ‘ती’ पुरस्कार’ मार्च २०२०
उद्योगिनी पुरस्कार- ज्येष्ठ नागरिक संघ मुलुंड तर्फे २०१३
सामाजिक सेवा पुरस्कार
ज्येष्ठ नागरिक संघ मुलुंड तर्फे २०१९
सामाजिक सेवा पुरस्कार
सिद्धाचल समुहा तर्फे २०१९

Categories: नेहमीच अग्रगण्य, Virangana











