मीरा रोड matters

नागरिकांमध्ये नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या कार्यपद्धतीची खूप प्रशंसा

वॉर्ड क्रमांक 17 मधील नागरिकांना उघड्या व बिकट स्थितीत असलेल्या नाल्यामुळे आरोग्यविषयक व रहदारीचा समस्या निर्माण झाल्या होत्या, त्याची विभागातील नागरिकांनी व्यथा नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्यासमोर मांडली.

      त्यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत मिरा-भाईंदर महापालिकेच्या निगडित विभागांकडे पाठपुरावा करून दिनांक 28/ 06 /2020 ला  स्वतःच्या उपस्थित व देखरेखीखालीं वॉर्ड क्रमांक 17 मधील शितल पार्क विभागातील जय गोपाळ मार्ग व शिवाजी हॉटेल येथील विभाजन मार्गावरील नादुरुस्त स्थितीत असलेल्या नाल्याची दुरुस्ती व बांधणी करून त्‍यावर नवीन झाकण बसवून घेतले. तात्काळ झालेल्या  कारवाई मुळे विभागातील नागरिकांमध्ये नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या कार्यपद्धतीची खूप खूप प्रशंसा होत आहे.

Leave a comment