मीरा रोड matters

नगरसेविका हेमा बेलानी यांनी कामाचा छडा लावण्यास सुरुवात

पावसाचे आगमन होताच शहरात विविध समस्या उद्भवू लागतात नगरसेविका या नात्याने त्यांचे निराकरण करणे आवश्यक असते हेच ध्येय मानून प्रभाग क्रमांक १७ मधील नगरसेविका हेमा बेलानी यांनी कामाचा छडा लावण्यास सुरुवात केली आहे.

प्रभात १७ मध्ये ठीक ठिकाणी सीसीसी रस्ते झाल्याने तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने काही ठिकाणी सखल भागात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती त्याची दखल घेत मीरा भाईंदर महापालिकेशी त्यांनी पत्रव्यवहार करून व व महापौर ज्योत्स्ना हस्नाले यांना सदर ठिकाणी बोलवून लोकांच्या समस्या अवगत करून दिल्या .

त्यानंतर महापौर ज्योत्स्ना हस्नाले व उपमहापौर हसमुख गेहलोत तसेच स्थायी समिती अध्यक्ष अशोक तिवारी यांनी नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांची मागणी मान्य केली व मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे त्यांना पाण्याचे निचरा करण्याचे पंप उपलब्ध करून दिले.

सदर पंप दिनांक 30/06 /2020 रोजी प्रभाग क्रमांक १७ च्या नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांनी आपल्या प्रभागातील पॅनल वरील इतर नगरसेवकांत सोबत आपल्या विभागातील आर एन ए ब्रॉडवे गेट क्रमांक १ व गेट क्रमांक २ तसेच सिल्वर पार्क व विजय पार्क या इमारती संकुला जवळील प्रवेशद्वाराजवळ पाणी निचरा करण्याचे सदर पंप बसवून घेतले. सदर कार्याबद्दल विभागातील नागरिकांनी नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांचे आभार मानले.

Leave a comment