प्रभाग क्रमांक १७ मधील विजय पार्क संकुलातील मानसी इमारतीत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होती. कित्येक वर्षापासून मुबलक प्रमाणात रहिवाशांना पाणीपुरवठा होत नव्हता. तदनंतर इमारतीतील रहिवाशांनी आपले गाऱ्हाणे स्थानिक नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्यासमोर मांडली. त्यावर त्यांनी लगेच कारवाई करण्याचे आश्वासन देऊन मीरा-भाईंदर जल विभागाशी पत्रव्यवहार सुरू केला व त्यांच्या या पत्रव्यवहारात त्यांना चांगले यश मिळाले.
अवघ्या पंधरा दिवसातच कारवाई करत मीरा-भाईंदर महापालिकेने नवीन पाणीपुरवठा नलिका मानसी इमारतीस जोडणी करून दिली . सदर कामामुळे मानसी इमारतीतील रहिवासी व पदाधिकारी अतिशय आनंदित झाले असून नवीन पाणीपुरवठा नलिका मार्गाच्या कामाचे शुभारंभ त्यांनी नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या हस्ते केले .

Categories: मीरा रोड matters











