दिवसागणिक वाढत चाललेल्या व रेड झोन झालेल्या अंधेरी विभागातील करोना चा पादुर्भाव रोखण्यासाठी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन तसेच विभागातील त्यांचे सहकारी व शिवसैनिक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. सदर कामाचा एक भाग म्हणून काल शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम द्वारे महानगरपालिका के पश्चिम च्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 69 मधील फादर वाडी अमृतलाल वाडी, जुहू गावठाण, राऊत लेन, गांधीग्राम रोड, कालू मल सोसायटी, ग्रीन फिल्ड, कैलास अपार्टमेंट, गुलशन, जानकी कुटीर, किंग्स अपार्टमेंट परिसर व प्रभाग क्रमांक 67 मधील परिमल इमारत, रूप दर्शन 60 , 90 फिट रोड, मनिष नगर, भाई भगत मार्ग, इंदिरानगर, शिवनगर ,विनायक टॉवर, अभिषेक अपार्टमेंट व एन दत्ता मार्ग परिसरात ट्रॅक्टरने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. सदर फवारणी वेळी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन ,शाखाप्रमुख दीपक सणस,शाखाप्रमुख संजय साखळे, उपशाखाप्रमुख हर्ष पारीख, रमेश पाटील, शौनक नाचणे, विक्रम संतांनी, सुनिल भालेकर, दिगंबर घोसाळकर आणि इतर पदाधिकारी तसेच अनेक शिवसैनिक त्यांच्या मदतीला उपस्थित होते. विभागात शिवसेनेच्या या कामाची खूप प्रशंसा होत आहे. तसेच विभागातील लोकांनी संजय मानाजी कदम व सुनिल खाबिया जैन यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करून सदर सुविधा उपलब्ध केल्या बाबत त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. अतिशय मागणी असलेल्या व व्यस्त विभाग असलेल्या फवारणी विभागाने तातडीने दखल घेत प्रभाग क्रमांक 69 व प्रभाग क्रमांक 67 मध्ये सॅनिटायझर ट्रॅक्टर उपलब्ध करून देऊन फवारणी केल्याबद्दल अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन यांनी मुंबई महानगरपालिका तसेच के पश्चिम विभाग महानगरपालिकेतील अधिकारी व सदर कामात भाग घेणाऱ्या महानगर पालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
Categories: अंधेरी matters











