मीरा रोड matters

आर्सेनिक अल्बम -30 या गोळ्यांचे वितरण स्थानिक नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या हस्ते आर एन ए ब्रॉडवे कॉम्प्लेक्स येथील एकूण २४ इमारतीत करण्यात आले

दिनांक १ जुलै २०२० रोजी प्रभाग क्रमांक १७ मधील आर एन ए ब्रॉडवे कॉम्प्लेक्स येथील एकूण २४ इमारतीत आर्सेनिक अल्बम -30 या गोळ्यांचे वितरण स्थानिक नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या  करोना आजाराचा पादुर्भाव रोखण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हस्नाले यांच्यामार्फत महापालिकेतील नगरसेवकांना सदर गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आर एन ए ब्रॉडवे कॉम्प्लेक्स येथील नागरिकांनी नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांचे सदर गोळ्या उपलब्ध करून वाटप केल्याबाबत आभार मानले.

Leave a comment