मीरा रोड matters

रवी पार्क विभागातील विजेचा पुरवठा पुन्हा सुरळीत करून दिला नगरसेविका हेमा राजेश बेलानी

प्रभाग क्रमांक १७ मधील रवी पार्क विभागातील  मार्गावरील विजेच्या खांबाच्या तारा नवीन नाला बांधणी करताना तुटल्या होत्या. त्यामुळे विभागातील नागरिकांना संध्याकाळ झाल्यावर अंधारात उंच मार्गक्रमण करावे लागत होते. त्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न  सुद्धा निर्माण झाला होता. सदर बाब नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या लक्षात येताच त्यांनी मीरा-भाईंदर महापालिकेच्या विद्युत नियंत्रण कक्षाशी पत्र व्यवहार करून सदर विद्युत तारा जोडणी करून घेतल्या व विजेचा पुरवठा  विभागात पुन्हा सुरळीत करून दिला. रवी पार्क विभागातील नागरिकांनी स्थानिक नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांचे आभार मानले. तर नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विद्युत नियंत्रण कक्षाचे व कर्मचाऱ्यांचे तातडीने कारवाई केल्या बद्दल आभार मानले.

Leave a comment