मुंबई : महाराष्ट्र प्रांतिक नाथपंथी डवरी गोसावी समाज संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत समाजबांधवांना लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
सदर संस्थेची स्थापना डवरी कॉलनी, जवाहर नगर, सांताक्रुझ (पूर्व) मुंबई येथे दि, २६ सप्टेंबर १९५० साली करण्यात आली. या सप्टेंबर महिन्याच्या दि,२६ तारखेला या संस्थेला ७० वर्ष पूर्ण होत आहे. नाथपंथी डवरी गोसावी, भराड़ी,गोंधळी, समाजाचे सर्वोच्च स्थान म्हणजे ही संस्था आहे.
भारतीय स्वतंत्र सेनानी आणि थोर समाज सुधारक अध्यक्ष ,संस्थापक.कै. विठोबा सावला जगताप (विठ्ठलबुवा) यांनी आणि त्यांच्या सहकारी समाज बांधवानी अथक परिश्रम करुण समाज एकत्र करून जागृत केला. ज्या समाजाला कोणते नाव नव्हते ,सरकारी दरबारी नोंद नव्हती, ज्यामुळे कोणते सामाजिक स्थान नव्हते, “महाराष्ट्र प्रांतीक नाथपंथी डवरी गोसावी समाज संस्थेची” सरकार दरबारी नोंद करुन, जातीची नोंद करून सामाजिक ओळख मिळवून दिली. तसेच १९६० पासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील अंनत कुटुंबााना समाजाचे दाखले उपलब्ध करून दिले. जातीच्या दाखले देण्यासाठी सरकारी दरबारी व्यवस्था निर्माण केली.
महाराष्ट्रच्या कानाकोप-र्यात नाथपंथी डवरी गोसावी समाज्याच्या वास्तव्यसाठी स्थान उपलब्ध करुन दिले. समाजातील अनेक कुटुंबाना शासनाकडून शेत जमीन मिळवून देवून, स्थिर स्थावर करून देण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा केली. समाजात प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन करून समाज शिक्षणाभिमुख केला.
१९५० पासून सर्व सरकार कचेरीत समाज्याच्या अनेक यातनांना तोंड फोडून अनेक अकल्पनीय आणि अद्धितीय कार्य कै. विठोबा जगताप यांनी या संस्थेद्वारे केले. आज आपल्या समाज्यात अनेक लोक शिकलेले आहेत. आज समाजात वकील ,डॉक्टर, पुलिस,इंजिनियर,शिक्षक, सरकारी अधिकारी,उद्योगी, १०वी,१२वी,पदवीधर आहेत, ही ह्या वटवृक्ष संस्थेची गोड फळे आहेत.आणि प्रत्येक जण आप आपल्या परिने स्वतःची प्रगती करत आहे.
या सामाजिक मंदिराचा ” महाराष्ट्र प्रांतिक नाथपंथी डवरी गोसावी समाज संस्था” पाया आहे.ज्याप्रमाणे मंदिराचा कळस परस्थितिप्रमाणे बदलतो, पण फाउंडेशन(पाया) कधीच बदलत नाही, तो बदलायचा असेल तर सारे आधार पाडावे लागतात.पूर्ण मंदिर विध्वस्त करावे लागते. तशीच ही संस्था आणि कै. विठोबा जगताप हे या समाजाचे आद्य दैवत व समाजाचे प्रथम प्रबोधनकार आणि प्रगतिचे शिल्पकार आहेत.
या संस्थेतिल लोंकानी उपाशी तापशी राहून, भिक्षा मागून, उसनी काढून, घरे दारे विकुन,परिवारा कड़े दुर्लक्ष करुन समाज कल्याणासाठी आयुष्य वेचले,पायी चालून समाजकार्य केले. कधीच स्वार्थ बाळगला नाही, सामाजिक फायदा घेवून पैसा कमावला नाही. लहान मोठा-भेद केला नाही,कधीही प्रकाशझोकत येण्याची नाहक इच्छा बाळगली नाही. सामाजिक तेड़ निर्माण केले नाही. म्हणून आज तगायत ही संस्था आपले मुल्ये जपून आहे. 70 वर्षापासून निष्कंलक,निःस्वार्थ अविरत सेवा करत आहे.
जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी , लोकमान्य टिळक ,जसे अण्णाभाऊ साठे , महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज,तसेच महाराष्ट्रातील “नाथपंथी डवरी गोसावी” गोंधळी,भराड़ी तर इतर भारतातिल राज्यातील नाथजोगी नावाने असलेल्या समाजाचे “महाराष्ट्र प्रांतिक नाथपंथी ड़वरी गोसावी समाज संस्थेचे” संस्थापक,अध्यक्ष कै. विठोबा जगताप (विठ्ठलबुवा) महापुरुष आणि आध्यप्रवर्तक आहेत.ज्याच्या अथक परिश्रमामुळे या समाजाची जातिची नोंद सरकार दरबारी झाली.समाजबांधवांना जातीचे दाखले तसेच आरक्षण लाभ मिळाले. सरकारी जमीन कसायला आणि स्थिर स्थावर होण्यास मिळाली. सरकारी योजना वा शिक्षणाची कवाड़े खुली झाली,पण आजही समाजाची खूप दुरावस्था आहे. समाजाचा सर्वागिण विकास झाला नाही. शेवटच्या समाज बांधवा पर्यन्त अनेक कारणामुळे पोहचता आले नाही.आज पुन्हा एकदा, “महाराष्ट्र प्रांतिक नाथपंथी डवरी गोसावी समाज संस्था” एक लढाई लढणार आहे.भारतातल्या सर्व नाथपंती ,नाथजोगी समाजासाठी,त्याना प्रबल करण्यासाठी, ही लढाई आहे.कट्टर हिंदू धर्म प्रसारक व नाथ संप्रदायाची अमूल्य परंपरा लाभलेला या समाजाला त्याचे वैभव प्राप्त करुण देण्यासाठीची. ही धर्माची लढाई आहे. ही लढाई सत्याची आणि अस्तित्वाची आहे. ही लढाई आहे प्रगत विचारांची. ही लढाई आहे येणाऱ्या नव्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी. ही लढाई आहे,आपसातील मतभेद मिटवून एकत्र येण्याची.आणि सरकारकडून आपले हक्क मिळवुन घेण्याची. ही लढाई आहे,आज पर्यन्त आपल्या समाजाची झालेली सामाजिक अवहेलना,आर्थिक कुचंबणा शैक्षणिक दुर्गति आणि राजनैतिक उपेक्षा या सर्व अन्याय विरुद्धची. ही लढाई आहे नाथ सैनिकांची !!!
Categories: NGO











