प्रभाग क्रमांक 20 (अ) दिनांक ३०/०७/२०२० माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक नगरसेविका मालती रमाकांत पाटील तसेच भारतीय जैन संघटना व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये सदर शिबिर शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला सदर शिबिरात ताप, सर्दी, अंगदुखी, उलटी जुलाब या प्राथमिक आजारांवर मोफत औषध उपचार डॉक्टर होमिओपॅथिक पूजा कदम तसेच सिस्टर पौर्णिमा घरात यांच्या मार्फत देण्यात आले त्या वेळी सदर शिबिरात काही कोरोना ची प्राथमिक लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना त्वरित हाजुरी येथे ठाणे महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या विनामूल्य रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनेते रमाकांत (दादा)पाटील, शाखा प्रमुक श्री प्रशांत पाटील ठाणे महानगरपालिका चे कार्यालयीन अध्यक्ष लक्ष्मण गरुडकर, लिपिक मनोहर आंब्रे ,विवेक कापडे ,लक्ष्मण शिवले, प्रशांत थावरे, शिपाई लक्ष्मण खेडकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, पन्ना पाटील, मयूर ठाकूर,अमित शिंदे, अवधूत कदम, चिन्मय पाटील, मनोज भोईर, अत्तर सय्यद यांचा सिंहाचा वाटा लाभला
Categories: ठाणे Matters















