शून्य मांडा-टिटवाळा कोविड मोहिमेंतर्गत (धारावी पॅटर्न ) रेजन्सी सर्वम या मांडा-टिटवाळयातील सर्वात मोठ्या सोसायटीमधील ११०० कुटुंबांची चाचणी करण्यात आली. तसेच आजपर्यंत ७२०० कुटुंबांची चाचणी करण्यात आली असून अजूनही न थकता नगरसेविका सौ. ऊपेक्षा शक्ती भोईर यांचे सहकारी, कोविडयोध्ये हे कार्य अविरतपणे करत आहेत. झालेल्या तपासणीमध्ये सोसायटीतील वैभव खिस्मतराव,विजय देशमुख, निलेश देसाई, धनंजय सोनकुल या काही स्थानिक तरुणांनी स्वइच्छने सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य केले त्याबद्दल धन्यवाद. तसेच प्रत्येक सोसायटीतील सदस्यांनी आपुलकीने स्वागत करून सहकार्य दर्शविले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद…
Categories: टिटवाळा matters


















