भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन असल्याने नागरिक घरातच आहे. त्यामुळे जे गरीब, हात मजुरी करणारे, रोज कमाविणारे यांचे या लॉक डाऊनमुळे हाल होत आहेत. रोजच्या जेवणाची काळजी लागून राहिली आहेत. ही अडचण लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८ मांडा-टिटवाळा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सौ. अपेक्षा बंदेश जाधव यांनी आपल्या प्रभागात गोर गरीब हात मजुरी करणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. आज स्मशान भुमी परिसर, सिद्धिविनायक चाळ, जय अंबे माता मित्र मंडळ चाळ येथील गोर-गरीब-गरजू नागरिकांना जेवण वाटप केले. येथे जवळपास एक हजार नागरिकांना जेवण वाटप करण्यात आले. या अगोदर आझाद नगर येथेही अन्नदान केले. त्यामुळे येथील या नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. या जेवण वाटप -अन्नदानाच्या वेळी नगरसेविका सौ. अपेक्षा बंदेश जाधव यांच्या समवेत मनसेचे मांडा-टिटवाळा विभाग अध्यक्ष मधुकर भोईर, कल्याण उपशहर अध्यक्ष दिनेश भोय, वॉर्ड क्र. ८ शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, मांडा-टिटवाळा उप विभाग अध्यक्ष बंदेश जाधव, राम भोईर, गणेश भोय, अश्पक वाजा , बालम पाटील , दीपक साळवी, जयेश खंदारे व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
Categories: टिटवाळा matters















