१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वृक्ष संवर्धन तसेच कोरोना योद्धाचा गौरव समारंभ
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते.या पवित्र दिनी नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने संन्माननीय आमदार ,शहर अध्यक्ष निरंजनजी डावखरे यांचे शुभहस्ते प्रभागातील सोसायट्यासाठी नीम, आंबा, जांभूळ अश्या फळझाड्यांचे वाटप करण्याचा उपक्रम करण्यात आला.त्याच बरोबर कोरोनाशी झुंज देणाऱ्या कोरोना योद्धाचाही , विशेष करून सफाई कर्मचारी ,फवारणी कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात झेंडा वंदन हे नौपाडा-कोपरी प्रभाग समीती सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ . शलाका थोरात, जेष्ठ नेते व माजी नगरसेवक दिनकर भाऊ दामले , फवारणी अधिकारी राजेंद्र चौधरी ,तसेच प्रभागातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
( सौजन्य:- डॉ .राजेश मढवी अध्यक्ष ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान ,ठाणे )
Categories: ठाणे Matters
















