ठाणे Matters

भाजपा नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे केंद्र शासन पुरस्कृत व ठाणे म .पा अंतर्गत ‘पंतप्रधान पथविक्रेता कर्जपुरवठा उपक्रम ” संपन्न

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन मुळे गेल्या ६ महिन्यात समाजातील विशेषतः गरीब,रोजंदारीवर जगणारा नागरिक गट चांगलाच भरडला गेलाय. याची गांभीर्याने दखल घेत केंद्र शासनाने पथविक्रेत्यांसाठी कर्जपुरवठा योजना अंमलात आणली आहे .या अंतर्गत भाजपा ठाणे आमदार संजयजी केळकर व ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांनी नौपाडा प्रभागात या गावदेवी भागात महापालिकेने प्रमाणीत केलेल्या पथविक्रेत्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून पंतप्रधान पथविक्रेता कर्ज योजना अंतर्गत ठाणे महापालिकेच्या वतीने कर्ज मेळावा शिबीर भरविले होते.स्थानिक गरीब,गरजू पथविक्रेत्यांनी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ,मास्क ,सॅनीटायझर या सर्व बाबींचे नियम पाळून या शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला.या अंतर्गत लाभार्थ्याला रू.१००००/ चे कर्ज मिऴणार आहे.
सौजन्य :- डॉ.राजेश मढवी ( अध्यक्ष : ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान )

Leave a comment