आज संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा तर्फे दार उघड उद्धवा दार उघड अशा घोषणा देत सर्व मंदिरांसमोर घंटानाद करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडी करावीत, अशी आग्रही मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. नौपाडा येथील घंटाली मंदिरा बाहेर झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्षा माधवी ताई नाईक, नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका प्रतिभा मढवी, शमाताई पातकर , मानसी जोशी,सहिता देव, शिल्पा उतेकर, कांगणे, कुंटेताई तसेच सुरेंद्र हीर्लेकर व डॉ.राजेश मढवी आदी सहभागी झाले होते. या प्रसंगी सर्व भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Categories: ठाणे Matters














