कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता होणारा संसर्ग टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एम.सी.एच.आय क्रेडाई आणि नगरसेवक श्री अर्जुन शांताराम भोईर यांच्या माध्यमातून मोफत रॅपीड ॲंटिजन टेस्ट हा उपक्रम प्रभाग क्रमांक 18 खडकपाडा येथील नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन प्रभागांतील नागरिकांना रॅपीड ॲंटिजन टेस्ट करून घेण्यासाठी आवाहन केले होते.
नगरसेवक श्री अर्जुन शांताराम भोईर यांच्या संयुक्तपणे आयोजित शिबिरात रॅपीड ॲंटिजन टेस्ट मोफत करण्यात आले. यासाठी टायकुन्स रेसीडेंसी परिसरातील सुमारे ८६ लोकांची रॅपीड ॲंटिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ६ लोकांची टेस्ट पाॅझिटिव्ह आली असून ८० लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. साई संकुल परिसरातील सुमारे १७५ लोकांची रॅपीड ॲंटिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये १४ लोकांची टेस्ट पाॅझिटिव्ह आली असून १६१ लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ह्या प्रसंगी उपस्थित सोसायटी मधिल नागरिक, भारतीय जनता पार्टी वार्ड १८ चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या सर्वांचे सहकार्य लाभले.
Categories: कलयाण matters













