ठाणे Matters

ठाणे भाजपाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्ताने ठा.म.पाच्या गडकरी रंगायतन / घाणेकर नाट्यगृहाच्या दुर्लक्षीत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

प्रखर राष्ट्रभक्त ,अंत्योदयाचे प्रणेते *पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या पशवभूमीवर आर्थिक दृष्ट्या दुर्लक्षीत अशा ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायत तसेच काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या कर्मचारी वर्गाला नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी व समाजसेवक डॉ.राजेश मढवी यांचे सौजन्याने जीवनावश्यक वस्तूचे धान्य, कडधान्य,तेल इत्यादींचे वाटप करण्यात आले . महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधवी ताई नाईक यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार संजयजी केळकर, अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. सदर धान्य वाटपास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी आमदार आशीषजी शेलार, प्रदेश सचिव संदीपजी लेले ,गटनेते संजयजी वाघुले ,नगरसेविका मृणालजी पेंडसे ,सरचिटणीस विलासजी साठे,मनोहरजी सुखदरे ,गौरव सिंग ,भाऊ दामले,शरदजी पुरोहित ,सचिनजी आळशी ,क्षमाताई पातकर ,बापट  दाम्पत्य, परुळेकर,उतेकर तसेच युवा अध्यक्ष प्रशांत कळंबटे ,विनायक गाडेकर व असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment