कलयाण matters

शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख श्री. विजयजी साळवी यांच्या वाढदिवसाचा आगळा वेगळा सोहळा

शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख आदरणीय श्री. विजयजी साळवी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक व हितचिंतकानी साळवी साहेब यांच्या बाबतीत भावना पत्ररूपाने कळविल्या होत्या. त्या सर्वांच्या भावना पुस्तक रुपाने संकलित करून “तेजोनिधी” या पुस्तकाची निर्मिती केली. या पुस्तकाचे प्रकाशन कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार आदरणीय श्री विश्वनाथदादा भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख व मा. नगरसेवक सन्माननीय श्री. सुनिलजी वायले साहेब, विभागप्रमुख व मा. नगरसेवक सन्माननीय श्री. विद्याधरजी भोईर साहेब, उपविभाग प्रमुख सन्माननीय श्री. भागवतजी बैसाने साहेब, सन्माननीय श्री. सुधिरजी कंक व शिवसैनिक उपस्थित होते.
ज्यांना तेजोनिधी हे पुस्तक हवे असेल त्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा ही नम्र विनंती.
१) शिवसेना कल्याण शहर शाखा, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम.
गुरू पानेरकर मो. +919819861556
२) श्री. विजय साळवी
मोबाईल नंबर 9221400019

Leave a comment