महात्मा गांधीजी यांची जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणी स्वच्छता दिन असा सुवर्ण त्रिकोण साधत आज ठाणे शहरात पुतळे,बस स्टॉप,उद्यान ह्यांची स्वच्छता केली गेली, प्रभाग क्रमांक 21 मधे राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्यालगत परिसराची स्वच्छता केली, तसेच प्रभागतील जेष्ठ नागरिक कट्टे उद्यान व तेथील व्यायाम साधनांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले. , नगरसेवक सुनेश जोशी मृणाल पेंडसे आणि प्रतिभा मढवी यांच्या पुढाकाराने हे कार्य संपन्न झाले. याप्रसंगी समाजसेवक डॉक्टर राजेश मढवी ,राजेश ठाकरे (सरचिटणीस नौपाडा मंडल)संदीप काळे (अध्यक्ष प्रभाग क्र 21)शंकर मेंडन उपाध्यक्ष नौपाडा मंडल) गजानन संत शिवाजी मोरे रत्नेश मिश्रा जयप्रकाश यादव मनोज शुक्ला (उपाध्यक्ष नौपाडा मंडल) संहिता देव देशमुख ठा म् पा चे दिलीप आहिरे अमित मोटे हे उपस्थित होते.ज्यानी कोरोना काळात अविरत पणे काम केले असे ठामप सफाई कर्मचारी,स्वच्छता निरिक्षक ह्यांचे ह्या प्रसंगी आभार मानले. सेवा सप्ताहाची सांगता स्वच्छतेने झाली असली तरी नियमित स्वच्छतेसाठी आपण नेहमीच तत्पर राहून आपला प्रभाग स्वच्छ ठेऊया.
Categories: ठाणे Matters




















