आज दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी भास्कर कॉलनी महात्मा गांधी रोड येथे “ठाणे रिक्षा संघटना ” ही स्थानिक रिक्षा चालक व मालकांसाठी रिक्षा संघटनेची स्थापना डॉ. राजेश मढवी यांचे तर्फे करण्यात आली.
सदर रिक्षा संघटनेचा रिक्षा स्टँड भास्कर कॉलनी येथे सहाय्यक वाहतूक पोलीस अधिकारी प्रमोद परदेशी तसेच नगरसेविका सौ. प्रतिभा रा. मढवी यांचे शुभहस्ते करण्यात आले.
या रिक्षा संघटनेचे विशेष म्हणजे या रिक्षा चालकांना L.I.C. च्या आधारस्तंभ योजने अंतर्गत बीमा संरक्षण देण्यात येणार आहे आणि मुख्य म्हणजे याचा पहिला हफ्ता संघटनेचे संस्थापक/ प्रमुख सल्लागार डॉ. राजेश मढवी यांचे तर्फे भरण्यात येणार आहे.
सदर संघटनेचे कामकाज अध्यक्ष राजेश मिश्रा, सल्लागार म्हणून रमापती मौर्या व सचिन पावस्कर व इतर यांच्या अधिपत्याखाली चालणार आहे…
Categories: ठाणे Matters



















