१५ ऑक्टोबर म्हणजे मिसाईल मॅन, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्मदिवस, जयंतीचा दिवस. भारताच्या दक्षिणेकडील एका छोट्याश्या खेड्यात एक छोटा वृत्तपत्र विक्रेतापासून सुरू केलेला त्यांचा जीवनप्रवास म्हणजे सर्वांना प्रेरणा देणारा अध्याय आहे.
या दिनाचे औचित्य साधून आमदार संजयजी केळकर व अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका सौ.प्रतिभा रा. मढवी व समाजसेवक डॉ.राजेश मढवी यांच्या वतीने एक छान सामाजिक उपक्रम आज स्व.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचा केक समस्त वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हस्ते कापून सन्मान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात सदर वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण कवच म्हणून ऑक्सिमीटर व थर्मामीटर देण्यात आले तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबांना L.I.C. च्या आधारस्तंभ योजनेअंतर्गत बीमा कवच ही देण्यात आले आहे, जेनेकरून भविष्यात त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल.
सदर कार्यक्रमात जेष्ठ माजी नगरसेवक दिनकरजी दामले, वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष दत्ता घाडगे, उत्तर भारतीय मोर्चाचे शैलेश मिश्रा, समाजसेवक डॉ.राजेश मढवी तसेच वृत्तपत्र विक्रेते बंधू-भगिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Categories: ठाणे Matters














