बीजेपी सरकारने जे शेतकरी विरोधी विधेयक मंजूर केले आहे त्या विधेयकाला काँग्रेस पार्टीने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या विधेयकाला विरोध केला असून भारतीय शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढ़ा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने व ठाणे शहर (जि) कमिटी चे अध्यक्ष मा.श्री.विक्रांत चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार कोपरी-हजुरी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या ब्लॉक क्रमांक ५ वतीने दि.२७/१०/२०२० रोजी सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेत स्व. नारायण कोळी चौक, चेंदनी कोळीवाडा, कोपरी ठाणे पूर्व येथे स्वाक्षरी अभियान कार्यक्रम श्री. स्वप्निल कोळी यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. सदर ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच शहर कमिटी, ब्लॉक कमिटी तसेच युवक कांग्रेस चे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिति लाभली.
Categories: ठाणे Matters
















