गेले १५ वर्षे नौपाडा भास्कर कॉलनी येथील पावसाळ्यात येणाऱ्या पुरग्रस्त स्थितीतून लवकरच येथील नागरिकांची सुटका होणार आहे.
चिखलवाडी, तबेला, पंपींग स्टेशन, भास्कर कॉलनी चा भाग हा कायम पावसाळ्यात पाण्याखाली असतो. छातीभर पाण्यात गेले १५ वर्षे येथील ३००-४०० कुटुंबे पावसाळ्यात आपले हालाखीचे जीवन जगत आहेत. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून व बाधित नागरिकांना घेऊन स्थानिक नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी व समाजसेक डॉ.राजेश मढवी यांच्या वतीने प्रशासनाचा दरवाजा ठोठावण्यात आला. प्रशासनाने याची त्वरित दखल घेत या अतिवृष्टीमुळे जमणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन नाल्याचे काम सद्यस्थितीत सुरू केले आहे. त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. (MMRDA) चे अभियंता विनय सुर्वे यांना घेऊन सदर कामाची पाहणी केली. हे सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनीआम्हाला दिली. याबाबत प्रशासन, एम.एम.आर.डी.ए. (MMRDA) व ठाणे महापालिकेचे…… समाजसेवक डॉ.राजेश मढवी व नगरसेविका सौ.प्रतिभा रा. मढवी यांनीं नागरिकांतर्फे शतशः आभार मानले .
Categories: ठाणे Matters














