कोरोनाच्या पाश्वभूमीवर सिव्हील हॉस्पीटल येथे जिल्ह्यातील विविध भागातून नर्सिंग कोर्सची परिक्षा देण्यासाठी विद्यार्थी आले आहेत. यामध्ये तलासरी येथिल आदिवासी दुर्गम भागातूनही अंदाजे 30 विद्यार्थिनी आल्या आहेत.या सर्व मुलींची राहण्याची जेवणखाण्याची व्यवस्था कुठेच होत नव्हती त्यामुऴे त्यांच्या शिक्षक हतबल झाले होते.याबाबत डॉ .राजेश मढवी यांना माहीती मिळताच त्वरित त्यांनी या सर्व विद्यांर्थिंची राहण्याची व्यवस्था नजिकच्या निवारा केंद्रात केली.तसेच त्यांची संपूर्ण जेवणखाण चहापान याचीही व्यवस्था करण्यात आली.तसेच डॉ .सुभाष पाटील यांच्या माध्यमातून त्या सर्व मुलींची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी या विद्यार्थिंकडून एक छोटासा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.सदर कार्यक्रमास नगरसेविका प्रतिभा मढवी,ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ .राजेश मढवी,डॉ .सुभाष पाटील,निवारा केन्द्राच्या विद्या शिंदे, टाटा सोशलच्या कोमल दास,शिक्षीका बिंदूमँडम,बाबूरावसर व इतर मान्यवर उपस्थित होते….
Categories: ठाणे Matters
















