NGO

रे ऑफ होपचे अध्यक्ष श्री. एडवर्ड परेरा यांना प्रतिष्ठित डीपीआयएएफ दादासाहेब फाळके कोविड -१९ योद्धा पुरस्कार २०२०

श्री. एडवर्ड परेरा व त्यांचा मुलगा एलरॉय परेरा यांचा दादासाहेब फाळके कोविड -१९ पुरस्कार २०२० दरम्यान सत्कार करण्यात आला. एडवर्ड २० वर्षांपासून समाज सेवेत आहेत आणि डान्स दिल से या व्यासपिटावरून रस्त्यावरची मुले आणि अनाथ मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत आहेत.

चर्चगेटपासून विरार पर्यंत एडवर्ड व त्यांचा मुलगा एलरॉय गरीब कुटुंबांना राशन आणि इतर गरजा भागवत आहे.  २३ नोव्हेंबर २०२० रोजी पेनिन्सुला ग्रँड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमास अनेक सेलिब्रिटी अथीतींनी उपस्तिती लावली. श्रीमती उषा नाडकर्णी, श्री अमन वर्मा, सिमरन आहुजा, दिलीप सेन व अनेकांनी उपस्तिती देउन कार्यक्रमाची शोभा वाढवली . प्रतिष्ठित दादासाहेब फाळके कोविड -१९ योद्धा पुरस्कार डीपीआयएएफचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले डॉ. कल्याणजी जन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एडवर्ड यांनी त्यांचे कार्य ओळखल्याबद्दल मा.डॉ. कल्याणजी जनांचे आभार मानले.

Categories: NGO

Leave a comment