ठाणे Matters

ग्राहकांना अच्छे दिनची मिठाई भरवत काँग्रेसचे ठाण्यात अनोखे आंदोलन

दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसचे वतीने ठाण्यातील विविध पेट्रोल पंप समोर निदर्शने करण्यात आली . येणाऱ्या ग्राहकांना मिठाई देऊन अब की बार पेट्रोल ९० पार, वा रे वा मोदी सरकार असे घोषणा देत भा ज पा सरकारचे निषेध व्यक्त केले . या वेळी भा ज पा सरकारला आठवण करून देण्यात आली जेव्हा त्यांनी ५ रुपये दरवाढी साठी आंदोलन केले , या वरून फक्त सत्ते साठी लोकांची फसवणूक करून लोकांचा विश्वास घात केल्याचा आरोप देखिल करण्यात आले . आता भा ज प गप्प का ? असा प्रश्न विचारण्यात आला . ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येते काँग्रेस पदाधिकारी एकत्र येऊन निदर्शने करत आपला रोष व्यक्त करित होते .

Leave a comment